अभिनेत्री स्मिता तांबे 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

By  
on  

आपल्या आवडत्या कलाकारासोबत काम करायला मिळावं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. इतकंच नव्हे तर आपण ज्याचे चाहते आहोत त्याच्या आगामी भागांमध्ये झळकायला मिळणं ही गोष्ट कलाकारासाठी स्वप्नपुर्तीच ठरते. मराठी सिनेसृष्टीतली एक डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी स्मिता तांबेचं असंच एक स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे. स्मिता तांबेची वर्णी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  सेक्रेड गेम्स 2 मध्ये लागली आहे.

 

ह्यात ती चक्क एका इंटिलिजन्स ऑफीसरच्या भूमिकेत झळकतेय आणि तेही चक्क अभिनेता सैफ अली खानसह. सैफ साकारत असलेल्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेची आणि स्मिताच्या  इंटिलिजन्स ऑफीसरच्या भूमिकेची कामानिमित्त गाठभेट पडते. त्यांचा हा नेमका सीन आपल्याला वेबसिरीजमध्ये पाहायला मिळेल. 

Recommended

Loading...
Share