अमृता खानविलकरने ‘खतरोंके खिलाडी’च्या सेटवरून रोहित सोबतचा हा फोटो केला शेअर

By  
on  

हिंदी सिनेसृष्टीमधे विविध भूमिकांमधून झळकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर दहाव्या सिजनमध्ये स्पर्धक म्ह्णून सहभागी होणार आहे. तसेच याही सिजनचं सुत्रसंचालन रोहित शेट्टी करणार आहे हे यापुर्वी आम्ही तुम्हाला सांगितलं आहेच. तसेच या शोचं शुटिंग बल्गेरिया इथं पार पडणार असल्याचंही समोर आलं आहे.

 अमृताने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती रोहित शेट्टीसोबत दिसत आहे. याशिवाय अमृताने या शोमधील गर्ल गॅंगसोबतही एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अमृता, मलिष्का, भारती, अदा खान, करिष्मा तन्ना यादेखील आहेत. अमृताच्या चाहत्यांना देखील तिच्या खतरोंके खिलाडीमधील अ‍ॅपिअरन्ससाठी उत्सुक असतील.

 

Recommended

Loading...
Share