By  
on  

नरेंद्र दाभोलकरांचा खून आजही पचवता येत नाही : सोनाली कुलकर्णी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि थोर सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला आज सहा वर्ष पूर्ण झाली. परंतु मारेकऱ्यांचा तपास करण्यात प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला अपयश आलं. दाभोलकरांच्या खुनाच्या निषेधार्थ त्यांची निकटवर्तीय आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून या घटनेचा निषेध केला. 

सोनाली म्हणाली,''आयुष्यात अनेक वेळा अपयश आलं.. हाती आलेला डाव सोडून द्यावा लागला.. हरतानाही मनाला काय शिकता आलं ते बजावलं.. पण नरेंद्र दाभोलकरांचा खून आजही पचवता येत नाही.. येणार नाही.. निषेध! #jawabdo #WhoKilledDabholkar'' अशा शब्दांमध्ये सोनालीने आपला संताप व्यक्त केला. 

 

आज सकाळी ९ वाजता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अभिवादन सभा घेण्यात आली. जेव्हा खून झाला तेव्हा काँग्रेस आणि आघाडीचे सरकार होते. आणि आता भाजपचे सरकार आहे. परंतु दोन्ही सरकारांना आणि प्रशासन यंत्रणेला दाभोलकरांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अपयश आलं आहे, एकूणच नेत्यांमध्ये आणि सरकारी यंत्रणेमध्ये असलेली उदासीनता पाहायला मिळत आहे, अशा शब्दांमध्ये डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी नाराजी  व्यक्त केली.

Recommended

PeepingMoon Exclusive