अभिनेता सुबोध भावेची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर निवड

By  
on  

सुबोध भावे या नावाला विशेष ओळखीची गरज नाही. सुबोधने आजवर अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वत:ची खास छाप निर्माण केली आहे. सुबोधने साकारलेली प्रत्येक भूमिकेने रसिकांच्या मनात घर केलं आहे. आता सुबोधच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक  विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर सुबोधची निवड झाली आहे. या महामंडळाच्या संचालक पदी पाच संचालकांची निवड झाली आहे. याशिवाय अभिनेत्री निशा परुळेकरचाही या महामंडळात समावेश आहे. सुबोधने अलीकडेच सांगली, कोल्हापुरमधील पुरग्रस्तांसाठी मदत निधी उभारण्याचं आवाहन केलं होतं. सुबोध सध्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकातून रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share