अभिनेते सयाजी शिंदेंनी का मागितली सर्वांची माफी?

By  
on  

मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत कार्यरत असलेले अभिनेते सयाजी शिंदे नेहमीच समाजकार्यासाठी पुढाकार घेत असतात. तसेच वृक्ष लागवडीसाठी नेहमीच ते स्वतः पुढे येऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी झाडे लावत असतात. 

नुकतंच त्यांनी आघाडीच्या वृत्तवाहीनीला मुलाखतीत महाराष्ट्र सरकारच्या 33 कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमाला थोतांड म्हटलं होतं. परंतु त्यांनी आता या व्यक्तव्याबद्दल सर्वांची माफी मागुन 'माझ्या व्यक्तव्यामुळे ग्रामसेवकांची मनं दुखावली गेली आहेत.' असं म्हणुन माफी मागीतली. 

सयाजी पुढे म्हणाले,"एका भागाची दुर्देवी स्थिती बघुन माझ्याकडुन ही तीव्र प्रतिक्रिया आली. परंतु माझ्या या व्यक्तव्यामुळे जे ग्रामसेवक झोकुन देऊन काम करत आहेत त्यांची मनं दुखावली आहेत. माझ्या बोलण्यात चुक झाल्याने मी सर्वांची माफी मागुन दिलगिरी व्यक्त करतो."

सयाजी शिंदे हे संवेदनशील नट म्हणुन ओळखले जातात. त्यांनी सरकारच्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला थोतांड म्हटल्याने गदारोळ माजला होता.

Recommended

Loading...
Share