By  
on  

लंडनवारी करून आलेल्या आदिनाथ कोठारेचं कुटुंबियांकडून झालं जंगी स्वागत

मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे कबीर खान दिग्दर्शित '83' या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला होता. भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्डकपवर आधारित या सिनेमाची कहाणी असणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. त्यामुळे आदिनाथ गेले काही दिवस लंडनला गेला होता. परंतु आता आदिनाथ पुन्हा भारतात परतला असून घरी आल्या आल्या त्याचं कुटुंबियांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. 

आदिनाथला त्याच्या आईने आणि बायको उर्मिलाने ओवाळलं आणि औक्षण केलं. तसेच आदिनाथने आल्या आल्या त्याची गोड मुलगी 'जिजा' सोबत वेळ घालावला. कबीर खान दिग्दर्शित '83' हा सिनेमा १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive