पाहा Photos : फुलराणी नेहा पेंडसेच्या या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा !

By  
on  

आपल्या मादक सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नेहाच्या अभिनयासोबतच तिच्या विविध अदांचा नजराणा सोशल मिडीयाच्या माध्यमातून सतत चाहत्यांसमोर येत असतो आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. नेहा सतत आपले भारतीय व पाश्चिमात्य पेहरावातले विविध फोटो शेअर करते. तिने नुकतंच एक फ्लोरल फोटो शूट केलं आहे. त्यात ती अगदी फुलराणी दिसतेय. 

फिकट गुलाबी रंगाची सिल्कची साडी आणि त्यावर गुलाबाच्या प्रिंटची हलकीशी डिझाईन आणि स्लिव्हलेस ब्लाऊज आणि केसात माळलेलं गुलाबाचं फुल या साध्या पण सोज्वळ रुपात नेहाचं सौंदर्य खुललं आहे. 

 

 

 हॉट आणि बोल्ड अंदाजाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री नेहा पेंडसेने साखरपुडा उरकला आहे. नेहाने इटलीमध्ये तिचा साखरपुडा उरकला आहे. शार्दुलसिंग असं तिच्या भावी नव-याचं नाव आहे. इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो तिचा भावी पती असल्याचं स्पष्ट झालं. 

 

 

 

नेहाने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून करीअरला सुरुवात केली होती. याशिवाय ती 'हसरते'या हिंदी मालिकेतही दिसली होती. झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी मालिकेतही तिने भूमिका साकारली होती. या शिवाय हिंदी मधील मे आय कम इन मॅडम? , पार्टनर्स सारख्या मालिकांमध्येही दिसली होती. याशिवाय तिने हिंदी बिग बॉसमध्येही हजेरी लावली होती.

Recommended

Loading...
Share