रसिकांसाठी अभिनेत्री हृता दुर्गुळे घेऊन आली आहे स्टॉबेरी शेक

By  
on  

दुर्वा, फुलपाखरू यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेला लोभस चेहरा म्हणजे अभिनेत्री हृता दुर्गुळे. हृताने आजवर नाटक आणि मालिकेमधून अभिनयाची छाप सोडली आहे. आता ती ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्टफिल्ममधून रसिकांच्या समोर येत आहे. वडील आणि मुलीच्या नात्यावर ही शॉर्टफिल्म बेतली आहे. ह्र्ता या फिल्ममध्ये 19 वर्षांच्या मुलीची भूमिका साकारताना दिसत आहे.

 

शोनील यल्लतीकर हा या शॉर्ट फिल्मचा दिग्दर्शक आहे. सिंगल फादर आणि वयात आलेली मुलगी यांच्या नात्यातील हळवी गुंफण या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहे. हृता ‘दुर्वा’ या मालिकेतून रसिकांच्या समोर आली. फुलपाखरू या मालिकेने तिला प्रसिद्धी दिली.

 

काही दिवसांपुर्वीच तिने ‘दादा एक गुड न्युज आहे’ या नाटकात काम केलं होतं. या नाटकात ती उमेश कामतसोबत मुख्य भूमिका साकारली होती. आता तिला शॉर्ट फिल्ममध्ये पाहण्याची तिच्या फॅन्सनाही उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share