By  
on  

पाहा व्हिडिओ: आदर्श शिंदेचा स्वरसाज असलेलं सुयश टिळकचं गणपती विशेष गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सर्वांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. प्रत्येकजण लाडक्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच विशेष सणाचं औचित्य साधून 'एव्हरेस्ट मराठी'ने गणरायाचं विशेष गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. 

'हाक देतो गजानना' असं या गाण्याचं नाव असून सुयश टिळक धमाकेदार गाण्यात झळकत आहे. आदर्श शिंदेच्या आवाजाने या गाण्याला आणखी बहार अली आहे. 

 

राहुल, निनाद, शशांक यांनी हे गाणं लिहिलं आहे. अभिषेक करंगुटकर यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केले आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या गाण्याने अल्पावधीतच पंधरा हजारांहून अधिक प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive