By  
on  

साडी नेसलेल्या या अभिनेत्याला ओळखलं का?

आजवर अनेक अभिनेत्री साडी नेसून सुंदर दिसताना आपण पहिल्या आहेत. तसेच मराठी सिनेसृष्टीतले अनेक अभिनेते सुद्धा आजवर भूमिकेची गरज म्हणून साडी नेसताना प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. अगदी सचिन पिळगावकर पासून ते वैभव मांगले पर्यंत सर्वांनी साडी नेसून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. 

या कलाकारांच्या यादीत आता प्रियदर्शन जाधवच्या नावाची सुद्धा भर पडली आहे. प्रियदर्शनने नुकतंच स्वतःच्या सोशल मीडियावर साडी नेसल्याचा फोटो टाकून सर्वांना चकित केले आहे. 

प्रियदर्शनचा हा साडीतला फोटो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता आहे लूक प्रियदर्शनने आपल्या आगामी प्रोजेक्ट साठी केला आहे का? हे मात्र अद्याप गुलदस्तायत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive