By  
on  

जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारने करून दाखवलं, डॉ. अमोल कोल्हेंचा संताप

खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे नेहमी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असतात. लोकसभेत ते नेहमी हा प्रश्न उठवताना दिसतात. नुकतंच अमोल कोल्हेंनी स्वतःच्या सोशल मीडिया साईटवर महाराष्ट्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. 

अमोल कोल्हे या व्हिडीओमध्ये म्हणाले,"प्रत्येक किल्ल्यावर आधारीत एक एक प्रसंग त्या किल्यावर उभं राहु शकतो. त्यातुन पर्यटनाला वेगळी चालना मिळु शकते. कितीतरी जातींच्या पशु-पक्ष्यांचं गडकिल्यांवर वास्तव्य आहे. त्यांचं रक्षण होऊ शकतं."

 

अमोल पुढे म्हणतात,"गडकिल्यावर जे तरुण किंवा जे इतिहास अभ्यासक येतील त्यातुन तेथील स्थानिक तरुणांना रोजगार मिळु शकतो. त्यामुळे सरकारने शाश्वत विकासासोबत गडकिल्ल्यांचं पावित्र्य जपावं, ही माझी सरकारला विनंती आहे."

अशापद्धतीने अमोल कोल्हेंनी गडकिल्ले संवर्धनासाठी आवाज उठवला.

Recommended

PeepingMoon Exclusive