By  
on  

सिद्धीविनायक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत 'कलावंत' पथकाची शान

गणेशोत्सवात मिरवणुक ही ओघाने आलीच. हल्ली गणरायाचं आगमन आणि गणरायाचं विसर्जन या दोन महत्वाच्या प्रसंगी या मिरवणुकीचा थाट पाहायला मिळतो. यामध्ये महत्वाचं असतं ते म्हणजे ढोल-ताशा पथक. ढोल-ताशा पथकाचा ट्रेंड या मिरवणुकीत वाढत आहे. अनेक पथकं संपुर्ण महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. यातील एक महत्वाचं पथक म्हणजे मराठी सेलिब्रिटींचं 'कलावंत पथक' 

मराठीतील काही सेलिब्रिटींनी 2014 साली एकत्र येऊन या कलावंत पथकाची सुरुवात केली. या पथकाची सुरुवात पुण्याला झाली. परंतु गेल्या वर्षी सिद्धीविनायक येथील गणपती विसर्जनला हे कलावंत' पथक' मुंबईत दाखल झाले. आणि त्यांच्या उत्तम वादनाने त्यांनी सर्वांचीच मनं जिंकली. यंदाही सिद्धीविनायक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत 'कलावंत पथक' प्रमुख आकर्षण होते.

यावर्षी या पथकात सौरभ गोखले, आस्ताद काळे, श्रृती मराठे, तेजस्विनी पंडीत, स्नेहलता वसईकर, सुयश टिळक, अनुजा साठे आदी कलाकार मंडळी सहभागी होती. तसेच 'बिग बाॅस मराठी 2' फेम माधव देवचके, नेहा शितोळे हे सुद्धा या पथकातील आपल्या मित्रमैत्रीणींना प्रोत्साहन देण्यासाठी आले होते. 

सिद्धीविनायक मंदिरा ट्रस्टचे अध्यक्ष अभिनेते आदेश बांदेकर यांनी सुद्धा 'कलावंत' पथकाच्या नादावर ताल धरला. कलावंत पथकाच्या वादनाने संपुर्ण दादर परिसर निनदुन गेला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive