By  
on  

'बिग बाॅस मराठी 2'चा विजेता शिव ठाकरेचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

'बिग बाॅस मराठी 2' चं विजेतेपद शिव ठाकरेने पटकावलं. तेव्हापासुन शिवची लोकप्रियता वाढत चालली आहे. बिग बाॅस संपल्यानंतरही शिव-वीणाचं प्रेम घरात चर्चेत आहे. यामुळे बिग बाॅस संपलं तरीही शिव ठाकरेची लोकप्रियता अजुन ओसरली नाहीय. 

नुकतंच शिवने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात 'ये तो अभी शुरुआत है.. आगे देख कहा कहा जाता हु मै' असं म्हणत शिव ठाकरेने व्हिडीओ बनवला आहे. 

शिवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. शिवला मांजरेकरांनी आपल्या आगामी सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. त्यामुळे शिव महेश मांजरेकरांच्या आगामी 'वीर दोडले सात' या सिनेमात महत्वपुर्ण भुमिका साकारणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive