By  
on  

...म्हणुन मिलिंद सोमण आणि त्याची जोडीदार अंकीता कोनवार पुन्हा आले चर्चेत

बाॅलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेता, माॅडेल म्हणजे मिलींद सोमण. मिलिंदने मराठी सिनेसृष्टीत सुद्धा काम केलं आहे. मिलिंद एक उत्तम अभिनेत्यासोबत धावपटु म्हणुनही प्रसिद्ध आहे. त्याने अनेक मॅरोथाॅचं ब्रँड अँबेसेडर पद भुषवलं आहे. सध्या मिलींद एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. 

मिलिंद आणि अंकीताचा एक प्रमोशनल व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये हे दोघे त्यांच्यावर करण्यात आलेल्या कमेंट वाचतात. त्यावर एका कमेंटमध्ये अंकीताने मिलींदला पापाजी आवाज द्यावा असे म्हटले गेले आहे. ती कमेंट वाचल्यानंतर मिलींद खळखळुन हसला आणि मिश्किलपणे म्हणाला,"कधी कधी अंकीता मला पापाजी आवाजही देते" 

 

मिलींद आणि अंकीताच्या वयात जवळपास 26 वर्षांचे अंतर आहे. यावर विचारलं असता मिलिंद म्हणाला,"माझी आई आणि माझ्यात 26 वर्षांचे अंतर आहे. परंतु मला वाटतं वय हा केवळ आकडा आहे. सर्वांना प्रेम करण्याचं आणि जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असावं." अशी कुल अंदाजात मिलींदने प्रतिक्रिया दिली. 

मिलिंद आणि अंकीता यांनी लग्न केल्यानंतर दोघांच्या वयातल्या 26 वर्षांच्या अंतरावरुन त्यांची नेटक-यांनी खिल्ली उडवली. परंतु दोघांनीही त्याची फिकीर केली नाही. मिलींदचे अंकीतासोबतचे रोमँटीक फोटो सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Friday faces in flashback !! On the way to Minkiani pass last month . . Have an AMAZZIINNGGGG weekend people !!

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

Recommended

PeepingMoon Exclusive