'बिग बॉस मराठी 2' फेम नेहा शितोळेने बीच क्लिनींग उपक्रमात घेतला सहभाग   

By  
on  

बिग बॉस मराठी च्या महाअंतिम सोहळ्यात नेहा शितोळेने उपविजेतेपद पटकावलं. त्यानंतर नेहा पुण्यातल्या तिच्या घरच्या गणेशोत्सवाला उपस्थित होती. पुढे नेहाने मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत कलावंत पथकामध्ये ढोलवादन केले. 

आज सकाळी ८ वाजता 'मुंबई सिटीझन फोरम' अंतर्गत जुहू चौपाटीवर बीच क्लिनिंग उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला नेहा शितोळेने हजेरी लावली होती. फक्त हजेरीच नाही तर नेहाने या उपक्रमात सहभाग घेऊन गणपती विसर्जनानंतर जे निर्माल्य जमा होतं, ते स्वच्छ करून या उपक्रमाला हातभार लावला.

 

नेहा शितोळेने 'मुंबई सिटीझन फोरम'च्या स्वयंसेवकांसोबत काम करून स्वतःमधली समाजाप्रती असलेली संवेदनशीलता दाखवली. 'मुंबई सिटीझन फोरम'च्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल नेहाचे आभार मानले. बिग बॉस नंतर नेहा आता कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share