'सतरंगी राजस्थान'नंतर गायिका प्रियंका बर्वेचं नवं राजस्थानी गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

By  
on  

हिंदी तसेच मराठीमध्ये स्वतःच्या गायनाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय गायिका म्हणजे प्रियांका बर्वे. प्रियंका एक उत्तम गायिकेसोबत अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका सुद्धा आहे. प्रियंकाने मुघल-ए-आझम या हिंदी नाटकात स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तसेच 'संगीत सम्राट' या रिऍलिटी शो चं सूत्रसंचालन केलं आहे. 

प्रियांका स्वतःचे सोलो अल्बम सुद्धा लोकप्रिय आहेत. राजस्थानी बाजाचा 'सतरंगी राजस्थान' या प्रियांकाने गायलेल्या गाण्याला कानसेनांमध्ये पसंती मिळाली. या गाण्याच्या यशानंतर प्रियांका त्याच धाटणीचं 'बन्नी सा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजस्थानातले लोकप्रिय गायक मामे खान यांची साथ प्रियांकाला लाभली आहे. 

प्रियांकाचा या नव्या राजस्थानी गाण्याचा म्युझिक व्हिडिओ उद्या यू ट्यूब वर प्रदर्शित होणार आहे. आधीच्या राजस्थानी गाण्याप्रमाणे प्रियांकाच्या या नव्या गाण्याला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळणार का, हे पाहाणं कुतूहलाचा विषय आहे. 

Recommended

Loading...
Share