जितेंद्र जोशी म्हणतो, ‘हा टॅक्स भरण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल'

By  
on  

सध्या राज्यभरात रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. सामान्य माणसाला तर या रस्यांवरून चालण्यासाठी कसरत करावी लागतेच, पण कलाकारांनाही या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. अलीकडेच सुबोध भावे, जितेंद्र जोशी आणि प्रशांत दामले या कलाकारांनी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल उद्विग्नता व्यक्त केली आहे

. अभिनेता सुबोध भावे म्हणतो, ‘मागच्या आठवड्यात माझ्या भावाचा आणि काल माझ्या डॉक्टर असलेल्या मित्राचा रस्त्यावरच्या अपघातात जीव गेला.कारण तेच खड्डे,बेशिस्तपणा,निष्काळजीपणा आणि देशाच्या वाहतुकीचे नियम न पाळता जीव घेणारे छुपे दहशतवादी. विनंती करतो स्वतः वर आणि आपल्या घरच्यांवर प्रेम करत असाल तर गाडी चालवताना नियम पाळा,कारण कोणीतरी तुमची वाट पाहतंय आणि तुमची काळजी करतय.’ 

अभिनेता प्रशांत दामले यांनीही कल्याणमधील रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

 

अभिनेता जितेंद्र जोशीनेही याबद्दल मोठी पोस्ट शेअर करत रस्त्यांच्या खराब अवस्थेबद्दल मत मांडलं आहे.

 

Recommended

Loading...
Share