जेव्हा दबंग खानकडून केतकी माटेगावकरला मिळाली कौतुकाची थाप

By  
on  

जेव्हा आपल्या मेहनतीची दखल आणि कौतुक एका सुपरस्टारकडून घेण्यात येतं तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय असतो. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरला नुकताच आला. महेश मांजरेकरांच्या 'पांघरूण' या आगामी सिनेमात केतकीने 'निळाई' हे गाणं गायलं आहे. केतकीने गायलेल्या या गाण्याचं बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने कौतुक केलं. खुद्द सलमानने गाण्याची दखल घेतल्याने केतकीचा आनंद सध्या 'सातवे आसमान पर'आहे. 

दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या 'पांघरुण' या आगामी सिनेमात हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि वैभव जोशी यांनी लिहिलेलं 'निळाई' हे गाणं 'बिग बॉस मराठी 2' मध्ये जेव्हा सलमान खान आलेला त्यावेळी लाँच झालं होतं. त्यावेळी सलमानने या गाण्याबद्दल कौतुकोद्गार काढले. यामुळे केतकी खुश झाली असून तिने स्वतःच्या इन्स्ताग्राम एक पोस्ट लिहून आपला हा आनंद व्यक्त केला आहे. 

'पांघरुण या सुंदर सिनेमाचा मी भाग असल्याचा मला अभिमान आहे. मी गायलेलं निळाई गाणं हितेश मोडकने संगीतबद्ध केलं असून वैभव जोशी यांनी हे सुंदर गाणं लिहिलं आहे. जेव्हा बिग बॉसमध्ये सलमान खानच्या उपस्थितीत हे गाणं जेव्हा लाँच करण्यात आलं तेव्हा तो क्षण एखाद्या अमूल्य दागिन्यासारखा माझ्या आयुष्यात कायम राहील', अशा शब्दामध्ये केतकीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share