असा आहे अभिनेत्री जुई गडकरीच्या टॅटूमागील अर्थ

By  
on  

अभिनेत्री जुई गडकरी ही मराठी सिनेसृष्टीतील गोड अभिनेत्री. जुईने नुकतीच 'वर्तुळ' मालिकेमधून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली. जुई सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. जुईने नुकतंच स्वतःच्या हातावर नवा टॅटू गोंदवला आहे. जुईचा हा टॅटू सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 

जुईच्या या टॅटूवर पिपिंगमुन मराठीने जुईशी बातचीत केली असता जुई म्हणाली,''मला मुळातच टॅटूची आवड आहे. या टॅटूमध्ये दोन-तीन गोष्टींचा एकत्र संगम आहे.या मध्ये इनफिनिटीची खूण आहे. तसेच माझं मांजरींवर प्रेम असल्याने त्यांच्यावरचं प्रेम दर्शवणारी एक साईन सुद्धा या टॅटूमध्ये आहे.''

सध्या सोशल मीडियावर इनफिनिटीची साईन ट्रेंडिंगवर आहे. एका गोष्टीवर जेव्हा आपलं अखंड प्रेम असेल तेव्हा ते दर्शवण्यासाठी इन्फिनिटीच्या साईनचा वापर करण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे जुईच्या टॅटूमागचा उद्देश हा नक्कीच हटके आहे. सगळ्यांनाच जुईचा हा टॅटू आवडला आहे. 

Recommended

Loading...
Share