By  
on  

मी प्रेक्षकांमध्ये बसुन नाटकं पाहिली आहेत, परंतु कोणीही मला ओळखलं नाही: शरद पोंक्षे

लवकरच रंगभुमीवर वसंत कानेटकर लिखीत 'हिमालयाची सावली' हे नाटक येणार आहे. 1972 साली आलेलं हे नाटक दिग्दर्शक राजेश देशपांडे पुन्हा एकदा रंगभुमीवर आणत आहेत. या नाटकाच्या नव्या संचामध्ये अभिनेते शरद पोंक्षे नानासाहेबांची प्रमुख भुमिका साकारत आहेत. 

या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी नाटकामधील कलाकार आणि संपुर्ण टीम उपस्थित होती. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करत असलेले आणि या नाटकात प्रमुख भुमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी यावेळी एक किस्सा सांगीतला, जो ऐकुन सर्वजण काही क्षण स्तब्ध झाले. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'हिमालयाची सावली' नाटकाची पत्रकार परिषद... नाटकात प्रमुख भुमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री श्रृजा प्रभुदेसाई, दिग्दर्शक राजेश देशपांडेसह नाटकाचे संपुर्ण टीम उपस्थित . . @rjsh.deshpande @sharadponkshe @shruja_prabhudesai @rahulranaderara . . For More Updates Follow: @peepingmoonmarathi #marathi #celebrity #celebrities #celebupdates #instaceleb #actress #actor #photooftheday #Mumbai #instalove #PeepingMoon #PeepingMoonMarathi

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

शरद पोंक्षे म्हणाले,"जेव्हा मला कॅन्सरचं निदान झालं तेव्हा उपचार घेण्यासाठी मी संपुर्णतः बेडरेस्ट वर होतो. या काळात माझे सर्व मित्र मला भेटुन जात होते. परंतु कोणीही बाहेर वाच्यता केली नाही. मी थोडा बरा झाल्यानंतर रंगभुमीवरील झाडुन सर्व नाटकं प्रेक्षकांमध्ये बसुन पाहीली आहेत. परंतु माझ्या बदललेल्या शारीरीक अवस्थेमुळे कोणीही मला ओळखलं नाही. मी नाटकं पाहायचे आणि निघुन जायचो."

गेल्या वर्षभरापासुन शरद पोंक्षे कॅन्सरवरील उपचार घेत आहेत. वर्षभराच्या गॅपनंतर शरद पोंक्षेंना 'हिमालयाची सावली' नाटकाद्वारे पुन्हा अभिनय करताना बघण्यास त्यांचे चाहते आणि संपुर्ण नाट्यसृष्टी उत्सुक आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive