तेजस्विनी पंडितकडून प्रसाद ओक आणि मंजिरी ओकला 'हिरकणी' भेट

By  
on  

सध्या सर्वत्र प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाची चर्चा आहे. 'कच्चा लिंबू' नंतर प्रसाद ओक दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. नुकतंच 'हिरकणी'मधील 'शिवराज्याभिषेक' गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रसाद ओकला इंडस्ट्रीतील अनेक मित्रांकडून या सिनेमासाठी शुभेच्छा मिळत आहेत. 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकतंच 'हिरकणी' सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसाद ओक आणि मंजिरी ओकला खास भेटवस्तू दिली. 'हिरकणी'चा फोटो असलेला काळ्या रंगाचा टी-शर्ट या दोघांना भेट दिला. प्रसाद ओकने हा टी-शर्ट परिधान करून सोशल मीडियावर तेजस्विनीचे या सुंदर भेटवस्तूबद्दल आभार मानले. 

 

यातूनच मराठी इंडस्ट्रीमधले मित्र-मैत्रीण एकमेकांच्या कामाला कसे प्रोत्साहन देतात, हे यातून पाहायला मिळते. प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा बहुचर्चित सिनेमा २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Recommended

Loading...
Share