'बिग बॉस मराठी 2'नंतर किशोरी शहाणे झळकणार या माध्यामात

By  
on  

मराठी सिनेसृष्टीचा 80-90 चा काळ गाजवणारी सौंदर्यवान अभिनेत्री म्हणून किशोरी शहाणे यांनी आपला ठसा उमटवला आहे. आत्ताही त्या एखाद्या नवोदित अभिनेत्रीला लाजवतील असाच परफॉर्मन्स देतात. नृत्यातसुध्दा त्या तितक्याच पारंगत आहेत. त्यांच्या बहारदार नृत्याचे जलवे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. बिग बॉस मराठी 2 ची शुभ सकाळ आपल्या गोड अंदाजात किशोरी ताईच करत. अनेक वाद-विवाद करत आणि टास्क लिलया पार पाडून टॉप 6 स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान  किशोरीताईंनी मिळवला. सर्व स्पर्धकांसोबत मिळतं-जुळतं घेऊन वागण्याचा त्यांचा फंडा त्यांना पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर ठेऊन गेला. 

 

आता बिग बॉस मराठी 2 नंतर ह्या वयातही कुठलाही ब्रेक न घेतचा किशोरी ताईंनी आपल्या पुढच्या प्रोजेक्टचा शुभारंभ केला आहे. लवकरच किशोरी शहाणे प्रेक्षकांना वेबसिरीज ह्या नव्या माध्यमातून भेटायला येणार आहेत. ह्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये शुटींगला सुरुवातसुध्दा केली आहे. ही हिंदी वेबसिरीज असणार आहे. सर्वांनाच त्यांच्या ह्या नव्या वेबसिरीजची आता उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

Recommended

Loading...
Share