अभिनेत्री प्राजक्ता माळीने मानले मास्तरीणबाईंचे आभार... पण या मास्तरीणबाई आहेत तरी कोण?

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत स्वतःच्या अभिनयाने आणि मनमोहक अदांनी सर्वांना घायाळ करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या रिऍलिटी शो चं सूत्रसंचालन करत आहे. सध्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे. 

प्राजक्ताने स्वतःच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता योगासनं करताना दिसत आहे. 'पूर्वी मला साधं पद्मासन करता यायचं नाही. पण माझ्या मास्तरीण बाईंनी माझ्याकडून एक वर्षात हवेत पद्मासन करून घेतले.' अशी पोस्ट लिहून प्राजक्ताने इंस्टाग्रामवर स्वतःच्या योगा टिचरचे आभार मानले. या फोटोंमध्ये प्राजक्ता उर्ध्व 'पद्मासन', 'पिंडासन' हि दोन योगासनं करताना दिसत आहे. 

 

'अष्टांग योगसाधनेची मी आजन्म भक्त राहील.' असं लिहून तिने योगसाधनेचे महत्व सर्वांना पटवले. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे सूत्रसंचालन करत असून प्राजक्ता कोणत्या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share