खुशखबर! 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत कोंडाजीबाबांची साकारणारे आनंद काळे आता हॉलिवूडमध्ये

By  
on  

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत कोंडाजीबाबांच्या भूमिकेत स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते आनंद काळे आता थेट हॉलिवूडमध्ये झळकणार आहेत. ‘रिमेम्बर अॅम्निशिया’ असं या हॉलिवूडपटाचं नाव असून हा सिनेमा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे. 

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत कोंडाजीबाबांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनात त्यांनी घर केले. आता थेट आनंद काळे यांच्या अभिनयाची झलक हॉलिवूडमध्ये पाहायला मिळाल्याने आनंद काळे यांचे चाहते नक्कीच आनंदात असतील. परदेशात राहणारा एक डॉक्टर भारतामध्ये येऊन त्यांना कोणत्या अनुभवांना सामोरे जावे लागते, हे या सिनेमाचं कथानक असणारा आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

*”कोंडाजी बाबा फर्जंद”* काय बोलू ....खूप काही साठलंय... एका अभिनेत्याच्या आयुष्यात काही मोजक्याच भूमिका येतात ज्या अतिशय महत्त्वाच्या असतात.. सगळ्याच बाजूनी.. माझ्या अभिनय कारकिर्दीत सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरली ती ही.... *"कोंडाजी बाबा फर्जंद"* तुम्हा सर्वांसाठी आज हे सगळं संपेल... माझ्यासाठी १६ सप्टेंबरला पहाटे ५.३० ला शेवटचा शॉट झाला... कोंडाजी बाबा चं पॅकअप... डोळे भरून आले... कोंडाजी बाबाला सोडून बाहेर पडताना अवघड झाल... अजूनही पुरता नाही बाहेर पडलोय... थोडा वेळ लागेल .. साधारण ५६ दिवस मी कोंडाजी बाबा जगलो.. त्यातले शेवटचे ५ ते ६ दिवस आणि रात्री... खूप अवघड गेले...शूट करून दमून घरी आलो तरी झोप नाही... कोंडाजी बाबा सिद्दीला जिवंत का सापडेल? स्वतःला पेटवून घेऊन का कोठारात जाणार नाही? जाताना ५०-१०० घेऊन जाईल... असे अनेक विचार... पकडल्यानंतर देखील सिद्दीला मारायचा प्रयत्न कसा करेल? रिहर्सल ही करून झाली... पण ही एक मालिका आहे हे भान ठेवून सगळं सादर करावा लागत..याची जाणीव झाली... असो..... पण या भूमिकेने खूप काही शिकवलं... एक वेगळाच आत्मविश्वास तयार झाला.. माझ्या मर्यादा कळल्या... एक वेगळी समज तयार झाली... तुम्ही सर्वांनी खूप खूप खूप प्रचंड, भरभरून प्रेम दिलंत...खूप प्रेम दिलंत...भारावुन गेलो मी... एक अभिनेता यासाठी खूप आसुसलेला असतो...ते या भूमिकेनी मला पुरेपुर मिळवून दिला ...मला एक वेगळी ओळख मिळवून दिली... मी एका वेगळ्या दर्जा मध्ये गणला जाऊ लागलो.. एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवलं मला.. माझ्या कारकिर्दीत हा महत्वाचा टप्पा ठरला..यासाठी तुम्हा सर्वांचेच खूप खूप आभार.. तुम्ही मला जे प्रेम, सन्मान दिलात,या स्थानावर आणून बसवलेत त्या करिता पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार... असेच प्रेम आणि आशीर्वाद राहुद्या.... || हर हर महादेव ||

A post shared by Anand Kale Andy (@aanandkale) on

आनंद काळे यांनी ‘रिमेम्बर अॅम्निशिया’ या हॉलिवूडपटात समीर नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यामुळे 'स्वराज्यरक्षक संभाजी'  मालिकेत कोंडाजीबाबांची भूमिका साकारून आनंद काळे यांनी आता थेट हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. 

Recommended

Loading...
Share