'जोगवा'ची दहा वर्ष: 'जोगवा'च्या गाण्यावेळी अभिनेत्री मुक्ता बर्वेला झाली होती दुखापत

By  
on  

१० वर्षांपूर्वी 'जोगवा' हा सिनेमा प्रदर्शित झाला. राजीव पाटील दिग्दर्शित 'जोगवा' या मराठी सिनेमाने समीक्षक आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. या सिनेमाने मुक्ता बर्वेने अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मुक्ता बर्वेने सोशल मीडियावर या सिनेमाविषयी आठवण जागवली. आणि तिने शुटिंगदरम्यानचे काही फोटो शेयर केले. 

हे फोटो शेयर करतानाच तिने 'जोगवा'विषयी एक किस्सा सांगितला. 'मन रानात गेलं गं' या गाण्याचं शूटिंग पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत थोडं थोडं चालू होतं. या गाण्याच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी उडी मारताना मुक्ताला दुखापत झाली होती. आणि तिच्या पाठीला दुखापत झाली होती. मुक्ताने हीच आठवण चाहत्यांसोबत शेयर केली. तसेच 'जोगवा'च्या शुटिंगदरम्यानचे काही फोटो शेयर केले. 

 

राजीव पाटील दिग्दर्शित 'जोगवा' हा सिनेमा २००९ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने अनेक पुरस्कारांवर स्वतःची मोहोर उमटवली. 'जोगवा'मध्ये उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे, किशोर कदम, विनय आपटे, स्मिता तांबे, अनिता दाते आदी कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

Recommended

Loading...
Share