थेट किल्ले रायगडावरुन 'हिरकणी'च्या परिवाराने सर्वांना दिल्या दस-याच्या शुभेच्छा

By  
on  

किल्ले रायगडावरुन थेट 'हिरकणी' परिवाराकडून तुम्हा सर्वांना दस-याच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. ह्या शूर हिरकणीने पती व बाळासह सर्वांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सोनालीने आपल्या इन्स्याग्राम अकाऊंटवरुन सिनेमातील हा गोड फोटो शेअर करत अनोख्या शुभेच्छा दस-यानिमित्त देत फॅन्सना खुश केलं आहे. 

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी स्टारर  'हिरकणी' या ऐतिहासिक सिनेमाचा  टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर पाहताना अक्षरश: अंगावर शहारे येतात. घरी एकट्या असलेल्या आपल्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या आईची ही कथा आहे. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर बाळाला भेटण्यासाठी काळोखात गडाचा खडतर प्रवास करुन खाली उतरणारी हिरकणीची ही शौर्यागाथा आहे. 

 सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपले बाळ घरी एकटे आहे, भुकेले आहे या विचाराने व्याकूळ झालेली आई म्हणजे हिरकणीची झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली. आता प्रेक्षकांची माय माऊली हिरकणी उर्फ हिराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि प्रेमळ अशा व्यक्तिरेखेसोबत ओळख होणार आहे ज्याच्यावर हिराचा जीव जडलाय. हिराचं ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम आहे ती व्यक्ती म्हणजे जीवा. ‘हिरकणी’ चित्रपटात जीवा या व्यक्तिरेखेची भूमिका अभिनेता अमित खेडेकर याने साकारली आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमित यांची ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा बहुचर्चित सिनेमा २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share