पाहा video: अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांनी केली नवीन सिनेमाची घोषणा

By  
on  

आज दसरा म्हणजेच विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर आज अनेकजण नवीन गोष्टींना सुरुवात करतात. आजचाच मुहुर्त साधून अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांनीदेखील नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. त्यामुळे रसिकांनादेखील यांना एकत्र पाहण्याची उत्सुकता असेलच.

 

या दोघांनी शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये सिनेमाचं नाव सांगितलेलं नाही. पण अमृताने हिंट दिली की या सिनेमाचं शुटिंग तिच्या आवडत्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच हे परदेशातील ठिकाणीही होऊ शकतं. अमृता काही दिवसंपुर्वी खतरोंके खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती. आता ती ‘पाँडेचरी’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

Recommended

Loading...
Share