अभिजीत खांडकेकरने बेस्ट फ्रेंड श्रृती मराठेला दिल्या वाढदिवसाच्या झक्कास शुभेच्छा !

By  
on  

निरागस चेहरा आणि हसरं व्यक्तिमत्व अशी ओळख असणारी मालिका आणि सिनेमा जगतातली अभिनेत्री श्रृती मराठेचा आज वाढदिवस. ‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तर  ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत परीराणी आणि बानूच्या दुहेरी व्यक्तिरेखा साकारणा-या श्रृतीचं सर्वत्र कौतुक झालं. श्रृतीला तिचा बेस्टफ्रेॆंड अभिजीत खांडकेकरने तिच्यासोबतचा एक झक्कास फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दोघंही मुळचे पुण्याचे असल्याने त्यांचा मोठा ग्रुप आहे व ते नेहमीच मस्ती मूडमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळतात. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Oye shrutyeeee Happy Birthday #shrutimarathe #marathi

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

 

 

श्रृतीने नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. श्रृती सध्या  'बार्ड ऑफ ब्लड' मध्ये झळकत आहे. इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसिरीजमध्ये श्रुतीची व्यक्तिरेखा कोणती असेल हे समोर आलं नाही. श्रुती याआधी हिंदीमध्ये 'बुधिया सिंग-बॉर्न टू रन' या सिनेमात मनोज वाजपेयीसोबत झळकली होती.

 

Recommended

Loading...
Share