आता तुम्ही पार्टीत 'साकी साकी'वर थिरकू शकत नाही, जाणून घ्या कारण

By  
on  

नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट, हॉटेल, पब, बार अशा ठिकाणी डीजे किंवा साऊंड सिस्टीमवर लोकप्रिय गाणी वाजवली जातात. गाण्यांच्या ठेक्यावर नाचत नागरिक जल्लोष करतात. पण आता अशा प्रकारे आनंद साजरा करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे असंख्य पार्ट्यांचे आयोजन अडचणीत सापडले आहे. न्यायालयाने कॉपीराइटचा मुद्दा पुढे करत कोणतेही गाणे वा संगीत वाजवण्यास रेस्टॉरंट, हॉटेल, पब, बारच्या व्यवस्थापनांना मनाई केली आहे. आता तुम्ही पार्टीत 'साकी साकी'वर थिरकण्याच्या विचारात ्साल तर आधी तुमच्या आयोजकांनी याची परवानगी घेतली आहे का याची आधी खातरजमा तुम्हाला करुन घ्यावी लागेल. 

फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड अर्थात पीपीएल या संस्थेकडे 20 लाखांपेक्षा जास्त गाण्यांचे कॉपीराइट आहेत. या संस्थेने न्यायालयात दाद मागितल्यामुळे हॉटेलवाल्यांची पंचाईत झाली आहे. नियमानुसार अर्ज करुन आणि योग्य ते शुल्क भरुन विशिष्ट हेतूसाठी, विशिष्ट कालावधीसाठी गाणी वापरण्याचे परवाने विकत घेता येतात. पण आजवर अनेक रेस्टॉरंट, हॉटेल, पब, बार असे परवाने विकत घेण्याचे टाळून बेधडकपणे गाणी, संगीत वाजवत होते. आता न्यायालयाच्या आदेशानुसार विशिष्ट हेतूसाठी आणि विशिष्ट कालावधीसाठी पीपीपीकडून एकाचवेळी अनेकजण गाणी, संगीत वाजवण्यचे परवाने घेऊ शकतील. ज्यांच्याकडे परवाने असतील त्यांनाच संबंधित गाणी, संगीत वाजवता येणार आहे. परवाना नसताना व्यावसायिक आस्थापनांनी गाणी, संगीत वाजवल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

 

 

Recommended

Loading...
Share