2017 मध्ये झालेल्या दीपिका पदुकोणच्या ‘कोको क्लब’ पार्टीच्या फुटेजची NCB करणार चौकशी

By  
on  

दीपिका पदुकोणसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचं नाव ड्रग्ज प्रकरणात आलं आहे. या दरम्यान अमली पदार्थ प्रतिबंध विभाग आता 2017 मध्ये झालेल्या दीपिका पदुकोणच्या ‘कोको क्लब’ पार्टीची चौकशी केली आहे. 
या पार्टीत अनेक बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. यामध्ये दीपिका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आदित्य रॉय कपूर हे होते. यामध्ये काही चॅटवरही एनसीबीची नजर होती.

 

या चॅटमध्ये ड्रग्जबाबत चर्चा होत होती. यामधील काही चॅट दीपिका आणि तिची मॅनेजर करिष्मामध्ये आहे. यामध्ये दीपिका तिच्या मॅनेजरला एका पॉश क्लबमध्ये ‘हॅश’ घेऊन यायला सांगते आहे. या दोघींमधील हे चॅट 2017 मधील आहे. यादरम्यान दीपिका दिल्लीतील तिच्या वकिलांच्या संपर्कात असल्याचं समजत आहे. दीपिका सध्या शकुन बत्राच्या सिनेमाच्या शुटिंगसाठी गोव्यामध्ये आहे.

Recommended

Loading...
Share