By  
on  

अमृता खानविलकरने को-स्टार वैभव तत्त्ववादीला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

मराठीतला टॉल-डार्क आणि हॅण्डसम अभिनेता म्हणून वैभव तत्ववादी प्रसिध्द आहे. मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये वैभवच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळते.  आज 25 सप्टेंबर हा वैभवचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याची को-स्टार अमृता खानविलकरने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

वैभवससोबतचा एक कूल फोटो शेअर करत अमृता म्हणते, “वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा वैभव...मला खात्री आहे, तु मला चील करायला सांगतोयस” या फोटोत दोघांची जोडी फारच भारी दिसतेय.  

मराठीतली हॉट व ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हॅण्डसम हंक वैभव तत्ववादी या जोडीचा एक आगामी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. पॉंडीचेरी असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. 

 

 

सचिन कुंडलकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून या सिनेमाचं शूटींग गेल्यावर्षी पॉंडीचेरीमध्येच पार पडलं. अभिनेत्री सई ताम्हणकर, महेश मांजरेकर  आणि नीना कुलकर्णी यांच्यासुध्दा या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. दूरवर राहणा-या कुटुंबाची गोष्ट, अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. 
 या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे आयफोनवर चित्रित होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. त्यामुळे सर्वांनाच या सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive