By  
on  

डॉ.सलील कुलकर्णी ह्यांना एसपी बालसुब्रमण्यम यांच्यासह एक गाणं करण्याची संधी मिळाली होती

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ वर्षीय त्यांची प्राणज्योत मालवली. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती.  मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी इंडस्ट्रीला दिली आहेत. संगीत क्षेत्रातले ते दिग्गज होते. त्यांच्या निधनाने अवघ्या कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

मराठी सिनेसृष्टीतले प्रसिध्द संगीतकार, गायक आणि दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी ह्यांना एसपी बालसुब्रमण्यम यांच्यासोबत एक गाणं करण्याची संधी मिळाली होती. त्या आठवणींना कुलकर्णी यांनी नुकताच सोशल मिडीयाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. सोबतच बालसुब्रमण्यम  यांच्यासह एक फोटोसुध्दा पोस्ट केला आहे. 

सलील म्हणतात, "एक महान गायक, एक  अत्यंत निर्मळ व्यक्ती .. तुमच्याबरोबर एक गाणं करता आलं .. तुमचा आशीर्वाद मिळाला .. तुमचा आवाज आणि गाणी कायम स्मरणात राहतील"

 

 

 

 

अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडीयाद्वारे  त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive