स्वप्निल जोशीने असं केलं पत्नी लीनाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

By  
on  

अभिनेता स्वप्निल जोशी आपल्या कुटुंबाला किती प्राधान्य देतो हे आपण चांगलंच जाणतो. बिझी शेड्यूलमधून वेळ चाढून तो नेहमीच आई-बाब, पत्नी-मुलं यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालवताना पाहायला मिळतो. याची प्रचिती त्याच्या सोशल मिडीया पोस्टच्या माध्यमातून नेहमीच येते.

 

 

स्वप्निलची पत्नी लीनाचा आज वाढदिवस  आहे. त्यानिमित्ताने स्वप्निलने घरच्या घरी केलेल्या एका छोट्याशा सेलिब्रेशनचा गोड व्हिडीओ चाहचत्यांशी शेअर केला आहे.  मुलं राघव व मायराने आईचा म्हणजेच लीनाच्या वाढदिवसाचा केक कट केला . वाढदिवस आईचा असला तरी मुलांचा उत्साह यावेळी जास्त होता. अर्थातच या व्हिडीओत स्वप्निल नाहीय, कारण त्यानेच हा सेलिब्रेशनचा व्हिडीओ शूट केला आहे. 

 

स्वप्निल पत्नी लीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पोस्टमध्ये लिहतो, "लीना आपण गेलं दशकभर एकमेकांना ओळखतो...पण तरीही मी तुला सतत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तु एक उत्तम आई आहेस, संपूर्ण कुटुंबाला तु घट्ट धरुन ठेवलंयस. तु माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि खुप प्रेम बायको"

 

 

 

Recommended

Loading...
Share