बॉबी देओलच्या 'आश्रम'मध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीला करायचंय ‘सैराट-2’ मध्ये काम

By  
on  

निशिकांत  कामत दिग्दर्शित आणि रितेश देशमुख सुपरहिट सिनेमा ‘लय भारी’चा अवघा महाराष्ट्र फॅन आहे. या सिनेमातली अभिनेत्री अदिती पोहनकरला तुम्ही चांगलंच ओळखता. 


 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून अदिती नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. 

अलिकडेच अदिती पुन्हा एकदा चर्चेत आली ती बॉबी देओल स्टारर आश्रम या वेबसिरीजमुळे. या वेबसिरीजला ओटीटी प्ल्टफॉर्मवर भरुभरु प्रतिसाद मिळाला. 


 

 

या सुपरहिट सीरिजमध्ये तिने एका कुस्तीपटू तरुणीची भूमिका साकारली आहे. यासाठी तिचं बरंच कौतुक झालं. 

 


 

या वेबसिजनिमित्ताने अदितीने एका आघाडीच्या मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, 'सैराट'चा दुसरा भाग तयार झाला तर त्या चित्रपटात काम करायला नक्की आवडेल असं मनोगत व्यक्त केलं. 

 


 

अदितीने आजवर हिंदी, मराठी, तमिळ अशा विविध भाषांमधील सिनेमांमधून भूमिका साकारल्या आहेत, पण मराठीवर तिचं विशेष प्रेम आहे., मातृभाषेलाअदिती नेहमी प्राधान्य देते. 

 


 

Recommended

Loading...
Share