Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या दिखेचक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

By  
on  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा धम्माल विनोदी रिएलिटी शो नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. भन्नाट विनोदी स्किट्समुळे हा कार्यक्रम जितका रंगतो तितकाच याची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमात मजा येते . तीसुध्दा ह्यातील प्रत्येक स्कीट्सचा मनमुराद आस्वाद घेताना पाहायला मिळते. पण याचसोबत प्राजक्ताच्या या शोमधील विविध गेट्अपचीसुध्दा चर्चा असते. शोमधील तिच्या विविध गेट्अप्समुळे ती  नेहमी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. 

 

 

 

 /

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता आपल्या विविध लुक्समधून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते. 

 

 

 

 

 

 

 

प्रत्येक आऊटफिटमध्ये प्राजक्ता खुपच खास दिसते. ह्या लेहंगा चोलीत तर तिच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.  

 

 

 

 

 

 

 

 

 

प्यासा सिनेमातल्या ओळी कॅप्शनमध्ये लिहत प्राजक्ता स्वत:च्याच प्रेमात पडल्याचं दिसतंय. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

चाहत्यांना प्राजक्ताचे हे फोटो खुप आवडले असून त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.

Recommended

Loading...
Share