अभिनेत्री उषा जाधवच्या शिरपेचात मानाचा तुरा, मिळाला हा पुरस्कार

By  
on  

मराठी सिनेमा आणि कलाकार साता समुद्रापार झेंडा रोवताना दिसत आहेत. अनेक मराठी सिनेमावर आंतरराष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटवली आहे. अभिनेत्री उषा जाधवनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनयाचा डंका वाजवला आहे. इंडो जर्मन फिल्मवीक अ‍ॅण्ड फिल्मसच्या बर्लिन येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात 'माई घाट: क्राइम नं. १०३/२००५' यासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

 

 

एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची संवेदनशील कथा या सिनेमातुन मांडण्यात आली आहे. चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे अनंत महादेवन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यापुर्वी या सिनेमाने सिंगापूर आणि न्युयॉर्क फिल्म फेस्टीवलमधील अ‍ॅवॉर्ड आपल्या नावे केले आहेत. त्यापैकी या सिनेमासाठी  उषाने ‘न्युयॉर्क  सिनेमहोत्सवात' सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला आहे. .

Recommended

Loading...
Share