By  
on  

अमृता खानविलकरलाही बसला हॅकिंगचा झटका, हे मिडियम झालं हॅक

आजकाल मनातील भावना व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सोशल मिडिया. या माध्यमाद्वारे सामान्य व्यक्तीच नव्हे तर सेलिब्रिटीनांही व्यक्त होण्याचा मोह आवरत नाही.

पण अनेकदा सेलिब्रिटींना या माध्यमांचा झटकाही बसला आहे. अलीकडेच हरहुन्नरी अभिनेत्री अमृता खानविलकरचं इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. अलीकडेच तिने मोबाईलवरील अकाउंट्वरून चाहत्यांना ही गोष्ट शेअर केली आहे. या हॅकिंगविरोधात अमृताने तक्रार नोंदवली आहे. ती आणि तिची सोशल मिडिया टीम या प्रकरणाच्या मागे कोण आहे याचा तपास करत आहे.

https://www.instagram.com/p/BuI1yhuFFGN/?utm_source=ig_web_copy_link

मागचं वर्ष अमृतासाठी खुपच खास होतं. तिच्या ‘राजी’मधील कामाचं खुप कौतुक झालं आहे. त्यानंतर सत्यमेव जयतेमधील भूमिकेचंही खुप कौतुक झालं. सध्या ती पाँडिचेरीच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान तिचं अकाउंट हॅक झाल्याचं जाहीर केलं आहे. आता तिचं अकाउंट हॅक झालं आहे की हा सिनेमाच्या प्रमोशनचा भाग आहे, हे लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive