By  
on  

'मला ना lockdown ची सुट्टी ना work from home ची मुभा' , तृतीयेनिमित्त तेजस्विनीचा स्वच्छता कर्मचा-यांना सलाम

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  अभिनेत्री तेजस्विनी पंडितदेखील दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजात घडणाऱ्या घटनांवर अनोख्या कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे. यंदा आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना तेजस्विनी मानाचा सलाम करताना पाहायला मिळतेय. 

आज नवरात्रौत्सवाच्या तिस-या दिवशी म्हणजे तृतीयेला तेजस्विनीने स्वच्छता कर्मचा-यांना आपला सलाम केला आहे. करोना काळात हे स्वच्छता कर्मचारी आपलं काम अविरत करत आहेत, त्यांना कुठलीच मुभा नाहीय. म्हणूनच तेजस्विनी त्यांना वंदन करताना पोस्टमध्ये म्हणते," मला ना lockdown ची सुट्टी
ना work from home ची मुभा..तुझ्या स्वच्छ श्वासासाठी..देह हा माझा सदैव उभा..देह हा माझा सदैव उभा...
.."

हातात झाडू घेऊन रस्त्यावर उभी ठाकेलेली रणरागिणी आपल्या फोटोमधून तेजस्विनीने साकारलीय. तेजस्विनी पंडित तिस-या दिवशीच्या फोटोशूटविषयी सांगते, “दुर्गामातेने आपल्या शक्तीशाली त्रिशुळाने असुराचा वध केला होता. कोरोनारूपी असूराला पळवून लावायचे असेल, तर स्वच्छता आणि सॅनिटायझेशन महत्वाचेच ना.. कोरोना काळात स्वच्छता कर्मचा-यांच्या हातातल्या मोठ्या झाडुने ही त्रिशुळाचेच तर काम केले होते. त्यांच्यातल्या त्या दैवी कर्मांमूळेच तर आपण प्रत्येक गल्ली-बोळात, गावात, पाड्यात, शहरात स्वच्छता पाहू शकतोय.”

तेजस्विनी पंडित पूढे म्हणते, “आपण लहानपणापासून ऐकलंय, जिथे स्वच्छता असेल. तिथेच लक्ष्मीचा वास असतो. आणि वर्षाचे 365 दिवस दारोदारी स्वच्छता करण्याचं काम हे सफाई कर्मचारी करतात. त्यांच्यातल्या दैवीरूपाला माझे ह्या फोटोशूटव्दारे नमन.”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तृतीया तेजस्विनी पंडीतचं नवीन फोटोशूट आलं समोर, स्वच्छता कर्माचा-यांना केला मानाचा सलाम . . मला ना lockdown ची सुट्टी ना work from home ची मुभा तुझ्या स्वच्छ श्वासासाठी देह हा माझा सदैव उभा देह हा माझा सदैव उभा..... . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #devbarekaro #coronawarriors #thankyou #bmcworkers #swacchabharat #cleaners #sanitationworkers #safaikarmacharis #devmansa #tejaswwini #gratitude

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

 

दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. 2017 पासून तेजस्विनी पंडितने सिनेसृष्टीत एक पायंडाच पाडला आहे. तेजस्विनी पंडितच्या ह्या फोटोशूट मागे ईलसट्रेटर (चित्रकार) उदय मोहिते, फोटोग्राफर विवियन पुलन, लेखक आरजे आदिश आणि दिग्दर्शक धैर्यशील ह्यांचीही मेहनत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive