By  
on  

'श्वेत रंग सांगतो,नको कपटाचे डाग कोणते, नको माणुसकीचा अंत' , गायत्रीचं खास फोटोशूट

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं. आज तृतीया आहे. नवरात्रीचा  हा दिवस ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारी अशी हि देवी. या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. तप, संयम आणि त्यागासाठी हि देवी प्रसिद्ध आहे. पांढरा रंग तिला अतिशय प्रिय आहे. पांढरा रंग संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. तो शांततेचं प्रतिक आहे.  म्हणून नवरात्रीच्या ह्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्र परिधान केले जातात.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री नवरात्रौत्सवात रंगांचं महत्त्व सांगणारं खास फोटोशूट करतात. यंदा तुला पाहते  रे फेम अभिनेत्री गायत्री दातारनेही खास फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

गायत्री सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहणं  ती पसंत करते. 

 

 

 

गायत्रीने हे फक्त फोटोशूटच शेअर केलं नाही तर त्यासोबतच खास संदेशही दिला आहे.  

 

 

गायत्री सांगते कोणाबद्दलही द्वेष मत्सर बाळगू नका. आहे त्यातच समाधानी राहा. 

 

गायत्रीच्या तृतीयेनिमित्तच्या खास फोटोशूटवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive