उमेश कामतचा आगामी सिनेमा 'ताठकणा'चा उलगडला फर्स्ट लुक, जाणून घ्या

By  
on  

चतुरस्त्र अभिनेता उमेश कामत लवकरच एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. पाठीच्या कण्यावरील संशोधनातून जगविख्यात झालेल्या डॉ प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनचरित्रावर आधारित "ताठकणा" या आगामी सिनेमात उमेश डॉक्टरांची प्रमुख भूमिका साकारतोय.

या जीवनपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. नुकतंच या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक उलगडला. उमेशनेच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सिनेमाचा हे फर्स्ट पोस्टर चाहत्यांशी शेअर करत या जीवनपटाबद्दल माहिती दिली. 

डॉ. रामाणी यांनी लहानपणापासूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडत विलक्षण कौशल्याने आणि बुद्धीने आपली वाटचाल केली. हे करीत असताना आपल्या सामाजिक दृष्टीचे भान जपत हजारो रुग्णांच्या वेदना कमी केल्या, अनेकांना जीवनदान दिले. त्यांचा हाच दृष्टीकोन आपल्याला ‘ताठ कणा’ या त्यांच्या १७ आवृत्त्या प्रकशित झालेल्या वाचकप्रिय आत्मचरित्रात्मक पुस्तकातूनही अनुभवायला मिळतो. काही प्रमाणात या पुस्तकावर तसेच अन्य महत्त्वाच्या घटनांवर आधारलेला ‘ताठ कणा’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

 

 

 

‘डॉ.रामाणी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे’, उमेशने यावेळी सांगितले. ‘ताठ कणा’ हा एक वेगळा चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी ही आपल्यासाठी एका अजोड व्यक्तिमत्वाला जाणून घ्यायचा प्रवास असल्याचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी सांगितले. तर, ‘चित्रपटरूपाने दाखविण्यात येणारा प्रवास माझ्यासाठी निश्चितच आनंददायी आहे‘ असे डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी यावेळी सांगितले.

‘पाठीचा कणा’ म्हणजे माणसाच्या सामर्थ्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतिक. याच पाठीच्या कण्यावरील संशोधनातून जगविख्यात झालेल्या डॉक्टर रामाणी यांचा जीवनप्रवास या सिनेमात अनुभवता येणार आहे. श्रीकांत बोजेवार लिखीत या सिनेमाचं दिग्दर्शन गिरीश मोहिते करतायत. 

 

"ताठकणा"  या आगामी सिनेमात उमेश कामतसह दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गो-्हे, अजित भुरे , शैलेश दातार आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

Recommended

Loading...
Share