By  
on  

प्रिया मराठेने या प्रसिध्द मालिकेच्या आठवणींना दिला उजाळा

आपण कितीही नव्याचा ध्यास धरला तरी जुनं ते सोनंच असतं. छोट्या पडद्यावरच्या मालिकांचंही तसंच आहे. आज कितीतरी नव्या आणि कल्पक विषयांवर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत, पण त्यांना ह्या जुन्या मालिकांची सर नाही. तो काळच तसा होता, जेव्हा घराघरांत ह्या मालिकांचं शिर्षगीत एकाचवेळी ऐकू यायचं आणि सर्व टीव्हीसमोर जमायचे. या जुन्या क्लासिक मालिकांपैकीच एक प्रसिध्द कौटुंबिक मालिका म्हणजे ‘या सुखांनो या’. ह्या मालिकेने त्या काळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. 

विक्रम गोखले , ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, सुमुखी पेंडसे, शर्वरी लोहकरे,  संपदा जोगळेकर आणि प्रिया मराठे आदी कलाकारांच्या सदाबहार अभिनयाने ही मालिका सजली होती. अभिनेत्री प्रिया मराठेच्या कार्किर्दीतली ही पहिलीच मालिका होती. म्हणूनच नुकतंच सोशल मिडीयावर ह्या मालिकेच्या सेटवरचे काही अप्रतिम फोटो शेअर करत तिने आठवणींना उजाळा दिला आहे. 


 

ह्या पहिल्याच मालिकेत प्रियाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत स्क्रीन शेअर करता आली. प्रियाने ह्यात विक्रम गोखले यांच्या लेकीची व्यक्तिरेखा साकारली होती. प्रिया आपल्या पोस्टमध्ये म्हणते,  माझं भाग्यचं की मला ह्या सरव दिग्गजांसोबत काम करायला मिळालं. 
खरंच आहे, या सुखांनो या ...ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडलीय. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive