'आबाळ या जीवांची...आईस साहवेना मनुष्यरूप घेऊनि धरी, साक्षात आली अन्नपूर्णा', तेजस्विनीचा प्राणीमित्रांना सलाम

By  
on  

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीवेळी नऊ दिवस सामाजिक संदेश देणारे फोटोशूट करण्याचा एक पायंडाच सिनेसृष्टीत पाडला आहे. दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांंसमवेत तेजस्विनी पंडित नवरात्री स्पेशल फोटोशूट करत असते. यंदा आपल्या इल्यूस्ट्रेशन फोटो सीरिजमधून तेजस्विनी कोरोनायोध्द्यांना आदरांजली अर्पण करतेय. 

आज नवरात्रीचा पाचवा दिवस ह्या दिवशी तेजस्विनीने खास मुक्या प्राण्यासांठी देवदूत बनलेल्या प्राणीमित्रांना आपल्या खास इल्यूस्ट्रेशनमधून सलाम ठोकला आहे. उन असो वारा-पाऊस किंवा करोना सारखी भयंकर महामारी , पण हे प्राणीमित्र न घाबरता न डगमगता मुक्या जनावरांची काळजी घेतात. त्यांना खाऊ-पिऊ घालतात. 

तेजस्विनी प्राणीमित्रांना वंदन करत म्हणते,"विषाणूने या जगाची केली कैसी ही दैना मुक्या लेकरांचे या, अश्रु कुणी पुसेना आबाळ या जीवांची...आईस साहवेना..मनुष्यरूप घेऊनि धरी, साक्षात आली अन्नपूर्णा"

प्राण्यांना मायेने खाऊ घालणा-या प्राणीमित्रांमधल्या ‘दैवी’ कर्मांना ह्या फोटोव्दारे तेजस्विनी पंडितने आदरांजली अर्पण केली आहे. तेजस्विनी पंडित म्हणते, “भूतदया परमो धर्मा: ही शिकवण आज आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कोरोना पसरण्याची सुरूवात होण्याच्या काळात एक अफवा पसरली होती, की, प्राण्यांमूळेही कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा ह्या अफवेची सत्यासत्यता न पडताळता अनेकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना घराबाहेर काढले होते. ह्याच काळात अचानक सगळं लॉकडाऊन झाल्याने अनेक रस्त्यावरच्या प्राण्यांवर आणि पक्षांवरही उपासमारीची पाळी आली. तेव्हा प्राणीमित्र देवासारखे धावून गेले. आणि ह्या मुक्या जीवांना मदतीचा हात दिला. त्यांना आपल्या घासातला घास दिला. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता घराबाहेर पडून मुक्याजीवांना जवळ करणा-या प्राणीमित्रांना ह्या ईलस्ट्रेशन फोटोव्दारे माझे वंदन आहे.”

तेजस्विनी पूढे म्हणते, “माणूस तोंडाने सांगू शकतो की, त्यांला काही त्रास होतोय. पण हे बिचारे मुके प्राणी मात्र आपलं दुखणं-खुपणं नाही सांगू शकतं. ते बोलू शकत नाही, ह्याचा अर्थ की त्यांना भावना नसतात, असा नाही. पण आज जिथे माणूसच माणसाला विसरलाय, तिथे प्राण्यांची काय अवस्था झाली असेल. आपल्याकडे जनावरांना काहीच महत्व दिलं जात नाही हे दुर्देव. प्राणीमित्रांना आणि प्राणीमित्रसंघटनांनाही सरकारचा विशेष पाठिंबा नाही. प्राण्यांच्या शेल्टरहोमना अचानक बंद केल्याने अनेक आजारी- म्हातारे प्राणी बेवारशाप्रमाणे रस्त्यावर आले. हे सगळं कुठेतरी मनात खदखदत होतं. जे ह्या फोटोव्दारे साकारण्याचा प्रयत्न केलाय.” 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पंचमीनिमित्त प्राणी मित्रांना तेजस्विनीचा सलाम - - - . . विषाणूने या जगाची केली कैसी ही दैना मुक्या लेकरांचे या, अश्रु कुणी पुसेना आबाळ या जीवांची...आईस साहवेना मनुष्यरूप घेऊनि धरी, साक्षात आली अन्नपूर्णा. . . . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #देवमाणसं #दैवीकर्म #भूतदया #devbarekaro #coronawarriors #thankyou #animalwelfare #animalrescue #shelterhomes #animalcare #fostercare #adoptdontshop #tejaswwini #gratitude #tribute

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

 

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या चाहत्यांना तिच्या दरवर्षाच्या ह्या कल्पक फोटोशूटची उत्सुकता असते आणि सध्या कोरोनायोध्द्यांना ती वाहत असलेली आदरांजली रसिकांच्या खूपच पसंतीस पडत आहे. 

Recommended

Loading...
Share