अभिनेत्री गायत्री दातारने नवरात्री पंचमीनिमित्त चाहत्यांना दिला हा महत्त्वपूर्ण संदेश

By  
on  

नवरात्रौत्सव म्हटलं की उत्साह-चैतन्य भरभरुन वाहतो. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळतं.  दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी आनंद-हर्षोल्हास घेऊन येतात.  नवरात्र म्हटलं की महिलांचे सजण्या-नटण्याचे हक्काचे दिवस. त्यांचा हा सर्वात लाडका सण.

यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. करोना संकटामुळे सध्या हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाहीय. पण प्रत्येकजण घरच्या घरीच यथासांग नवरात्रोत्सव साजरा करतोय. 

नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस विविध रंगामधील, पेहरावातील, रुपातील फोटोशुट अनेक अभिनेत्रींनी केलं आहे. प्रत्येकाची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय. प्रत्येक अभिनेत्रीचं नवरात्री स्पेशल फोटोशूट हे वैविध्यपूर्ण आहे. 

 

 

तुला पाहते रे फेम अभिनेत्री गायत्री दातारनेसुध्दा यंदा नवरात्री स्पेशल फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. पण फक्त फोटोशूट न करता ती प्रत्येक दिवस एक खास संदेश चाहत्यांना देतेय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रंग निळा आजचा, दिवस आहे पाचवा वाया न घालवता, सर्वांनी पाणी वाचवा! . . . Outfit and Styling : @shwetatattooskar @shwetaskar @stylist.chaitalikulkarni @chaitalikulkarni Photographer : @ashish_sawant__ @team_aspiring_ Jewellery : @priyankapathak MUA : @kiransawant303 Hair- @hair_artist_sarojjanallu . . . #GayatriDatar #Day5 #navratri #navratra #navratri2020 #navratrispecial #blue #bluecolour #navratras #morning #goodmorning #Smile #pictureoftheday #ZeeMarathi #TulaPahateRe #IshaNimkar #ZeeYuva #LadiesZindabad #ChalaHawaYeuDya #Celebrity #MarathiActress #Pune #Mumbai #Love #Support #Gratitude #keeptheloveandsupportgamestrong

A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial) on

 

आजचा रंग निळा आहे. निळा रंग म्हणजे पाण्याचा रंग. त्यानिमित्ताने गायत्रीने चाहत्यांना पाणी वाचवा जीवन वाचवा हा मोलाचा संदेश दिला आहे. गायत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “रंग निळा आजचा, दिवस आहे पाचवा, वाया न घालवता, सर्वांनी पाणी वाचवा” 

गायत्रीच्या ह्या सुरेख फोटोंसह तिने दिलेल्या ह्या महत्त्वपूर्ण संदेशाव चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. 
 

Recommended

Loading...
Share