देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरते आहे. या मालिकेती रहस्य, थरार मालिकेला रंगत आणत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अदाकारीचंही कौतुक होत आहे.
यातीलच एक दमदार पात्र म्हणजे डिंपल. डिंपलच्या अवखळपणाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
डिंपलची व्यक्तिरेखा साकारली आहे अस्मिता देशमुखने. अस्मिता मुळची पुण्याची आहे. देवमाणूस ही तिची पहिली मालिका आहे.
डिंपलचा लूक या मालिकेत साधा असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ती बरीच स्टायलिश आहे. पाहा तिचे हे लूक्स