By  
on  

'दुखावलेल्या लेकरांना,समजेल का माझी ही रुग्णसेवा ?' तेजस्विनीचा रुग्णसेवकांना सलाम

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यंदा आपल्या नवरात्र स्पेशल फोटोशूटमधून करोनायोध्दांना सलाम करतेय. तीचं प्रत्येक इल्यूस्ट्रेशन खास आहे. डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, शेतकरी आणि प्राणीमित्रांना वंदन केल्यानंतर आज षष्ठीनिमित्त  रूग्णवाहिकेची सेवा तातडीने पोहोचवणा-यांना  मानवंदना दिली आहे.

”नाही मिळत आशिर्वाद मजला, नाही मिळत आभार…तुझ्या सुखी कुटुंबात माझा प्रवेश, जणू दु:खांचा प्रहार…बोचऱ्या नजरा असंख्य,अस्वस्थ नकोश्या जाणिवा. दुखावलेल्या लेकरांना,समजेल का माझी ही रुग्णसेवा ?”, असं कॅप्शन तेजस्विनीने या फोटोला दिलं आहे.रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणा-या रूग्णवाहिका चालकांचे तेजस्विनीने आभार मानले आहेत. 

तेजस्विनी पंडित म्हणते, “कोरोना झाल्यावर रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करू शकत नाही. तुम्हांला बरं नसताना, तुमचे आपले नातेवाईकही तुम्हांला हात धरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवू शकत नाही. अशावेळी एकाकी पडलेल्या रूग्णांना खरा मदतीचा हात दिला तो ह्या रूग्णवाहिका चालकांनी. आपला जीव धोक्यात घालून हजारो रूग्णांना त्यांनी जीवनदान मिळवण्यासाठी प्रयत्न केले. “

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

षष्ठीनिमित्त तेजस्विनीचा रूग्णवाहिका चालकांना सलाम . . नाही मिळत आशिर्वाद मजला, नाही मिळत आभार... तुझ्या सुखी कुटुंबात माझा प्रवेश, जणू दु:खांचा प्रहार... बोचऱ्या नजरा असंख्य,अस्वस्थ नकोश्या जाणिवा दुखावलेल्या लेकरांना,समजेल का माझी ही रुग्णसेवा ? . . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #देवमाणसं #दैवीकर्म #रुग्णवाहिका #devbarekaro #coronawarriors #thankyou #ambulance #ambulancepersonnel #EMS #emergencyservices #paramedics #nationalnetworkofemergencyservices #tejaswwini #gratitude #tribute

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

 

तेजस्विनी पूढे म्हणते, “आज आपण कोरोनायोध्द्यांमध्ये पोलिस, डॉक्टरांची नाव आवर्जून घेतो. पण रूग्णवाहिका चालकांच्या ह्या ‘खारी’च्या वाट्याला मात्र आपण विसरलो आहोत. जसा खारींनी प्रभु रामचंद्रांना सेतू बांधायला मदत केल्यामूळेच तर असत्यावर सत्याचा विजय झाला. तसंच कोरोनारूपी रावणाला हरवायला, रूग्णवाहिकांनी उचललेला वाटा खूप महत्वाचा आहे.”

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या चाहत्यांना तिच्या दरवर्षाच्या ह्या कल्पक फोटोशूटची उत्सुकता असते आणि सध्या कोरोनायोध्द्यांना ती वाहत असलेली आदरांजली रसिकांच्या खूपच पसंतीस पडत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive