By  
on  

सिद्धार्थ चांदेकरने दिले ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या दुस-या सीझनचे संकेत

 ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजची लोकप्रियता पाहून मेकर्सनी दुसरा सीझन आणायचंही नक्की केलं आहे. या सिरीजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता दुसरा सीझनच्या बातमीने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या सिरीजमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत होता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you for making me a part of your city. @nageshkukunoor S2 coming soon. . . . . #cityofdreams

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

 

आशिष राव गायकवाड असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं. प्रिया या वेबसिरीजमध्ये पूर्णिमा गायकवाड ही व्यक्तिरेखा साकारत होती. सत्तेसाठी आशिष आणि पुर्णिमा यांच्यामधील चालणा-या संघर्षाने सिरीजला अधिक रंजक बनवलं.  सिद्धार्थ चांदेकरने नुकताच या सिरीजचा दिग्दर्शक नागेश कुकनूरसोबत फोटो शेअर केला आहे. ‘तुमच्या City चा मला हिस्सा बनवल्याबाबत धन्यवाद.’ हे कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. याशिवाय त्याने सिटी ऑफ ड्रीम्स’च्या दुस-या सीझनचे संकेतही दिले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive