स्वप्नील जोशीने त्याच्या या खास मैत्रिणीविषयी चाहत्यांशी केलं शेअर

By  
on  

नवरात्रीच्या या पावन पर्वामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्या आयुष्यातील दुर्गांशी चाहत्यांसोबत भेट घडवून आणतो आहे. यापैकीच एका खास व्यक्तीबाबतच्या भावना त्याने चाहत्यांशी शेअर केल्या आहेत. स्वप्नील आणि मुक्ताच्या जोडीने कायमच पडद्यावर धमाल उडवून दिली आहे. त्याच्या या खास मैत्रिणीबाबत बोलताना स्वप्नील म्हणतो, ‘@muktabarve नावाच्या एका उत्तम अभिनेत्रीला मी अनेक दिवस टीव्हीवर, चित्रपटात पाहत होतो. तिचा नाटकातला दबदबा ऐकून होतो.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@muktabarve नावाच्या एका उत्तम अभिनेत्रीला मी अनेक दिवस टीव्हीवर, चित्रपटात पाहत होतो. तिचा नाटकातला दबदबा ऐकून होतो. मुंबई पुणे मुंबई १ त्यानिमित्ताने सतीशने तिला आणि मला एकत्र कास्ट केलं. आमची हाय हॅलो पलिकडे अजिबात ओळख नव्हती. पण चित्रपटाचं शूटिंग संपता संपता मुक्ता बर्वे माझी अगदी जवळची मैत्रीण झाली. तो २०१० चा दिवस आणि आजतागायत मुक्ता माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे. या प्रवासात मुक्ताचं मुक्ती झालं… मुक्तीचं मुक्ते झालं आणि मुक्तेचं खिकी… आम्ही फक्त चित्रपटसृष्टीबद्दल गप्पा मारत नाही तर Investments, Science, Politics, News… रस्ते, driving directions अशा वेगवेगळ्या विषयांवरती आमच्या गप्पा रंगतात. अभिनयातली ताकद काय असावी याचं मुक्ता एक उत्तम उदाहरण आहे. मला प्रचंड अभिमान आहे आणि खूप लकी वाटतं की co actor म्हणून मुक्ता बरोबर सगळ्यात जास्त काम करण्याची संधी मला मिळाली. आमच्या नात्याची गंमत अशी आहे की सकाळी सेटवर मित्र म्हणून एकमेकांना हाय म्हणतो, co actors म्हणून काम करतो आणि दिग्दर्शकानी कट म्हटल्यावर मी मुक्ताचा fan होऊन जातो. तिची अभिनयाची ताकद मला प्रत्येक वेळेला सरप्राईज करत जाते. लोकं म्हणतात की स्वप्नील आणि मुक्ता एकत्र आले की magic होतं. आणि हे वाक्य तंतोतंत खरं आहे. हे magic माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल Khiki I love you!! #navrati2020 #durgapuja #durga

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP