'हिरकणी'ची वर्षपूर्ती , प्रसाद ओक आणि सोनाली कुलकर्णीने शेअर केली खास पोस्ट

By  
on  

 'हिरकणी' सिनेमाने बॉक्स ऑफीसवर धडाकेबाज कामगिरी तर केलीच पण त्यासोबतच रसिकांच्या मनातसुध्दा खास स्थान निर्माण केलं. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारलेली 'हिरकणी' रसिकांना खुप भावली.प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.  गेल्यावर्षी ह्याच दिवशी 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या हिरकणीची आज वर्षपूर्ती. यानिमित्त प्रसाद ओक आणि सोनालीने खास पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केल्या आहेत. 

सोशल मिडीयावर ते लिहतात, "छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आणि तमाम रसिकांच्या पाठिंब्यामुळे "हिरकणी" SUPERHIT ठरली...असंच प्रेम अविरत असुद्या!!!"

घरी एकट्या असलेल्या आपल्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या आईची ही कथा आहे. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर बाळाला भेटण्यासाठी एका रात्रीत खोल  गडाचा खडतर प्रवास करुन खाली उतरणारी हिरकणीची ही शौर्यागाथा आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पडद्यावरचा भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा... अत्यंत क्रूर अशी कोजागिरीची रात्र... एका आईची आर्त अंगाई... एका बुरुजाला त्या आईचं दिलेलं नाव... आशाताईंच्या आवाजानी भरून पावलेली कलाकृती... या सगळ्या रोमहर्षक प्रवासाला आज १ वर्ष पूर्ण झालं... छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आणि तमाम रसिकांच्या पाठिंब्यामुळे "हिरकणी" SUPERHIT ठरली... असंच प्रेम अविरत असुद्या!!! जय भवानी!!! जय शिवराय!!! #hirkani #हिरकणी #sonaleekulkarni

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

मागच्या वर्षी दिवाळीत हिरकणीसह एकूण पाच सिनेमे प्रदर्शित झाले होते. तरी देखील प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित  'हिरकणी' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरली. 

Recommended

Loading...
Share