'प्लास्टिक मध्ये गुंडाळलेला देह तुझा माझ्या समोर येतो,अन...'; अष्टमीनिमित्त तेजस्विनीने शेअर केली ही फोस्ट

By  
on  

नवरात्रीनिमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडीत शेअर करत असलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे. यंदा ती आपल्या इल्यूस्ट्रेशन सिरीजमधून करोना योध्दांना सलाम करतेय. तिची प्रत्येक पोस्ट खास होती. आज अष्टमीनिमित्त तिने एका महत्त्वाच्या योध्दाला वंदन केलं आहे. करोना काळात अनेक बेवारस मृतदेहांना अग्नि देणा-यांच्या मनाची स्थिती तिने मांडली आहे. 

ही अस्वस्थ करणारी पोस्ट शेअर करत तेजस्विनी म्हणते, “प्लास्टिक मध्ये गुंडाळलेला देह तुझा माझ्या समोर येतो. अन माझ्या दोन वेळच्या जेवणाचा प्रवास सुरु होतो. संसर्ग होईल इतरांना म्हणून कुणी बाहेर आंदोलन करतो, मी मात्र असते सतत तुझ्या संपर्कात, माझा विचार कोण करतो ? पण मी जाणते सृष्टीसाठी निर्माण अन मुक्ती दोन्ही आढळ नियम आहेत आणि म्हणूनच तुला मुक्ती देण्यासाठी हात माझे सज्ज आहेत…”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अष्टमी . . प्लास्टिक मध्ये गुंडाळलेला देह तुझा माझ्या समोर येतो अन माझ्या दोन वेळच्या जेवणाचा प्रवास सुरु होतो. संसर्ग होईल इतरांना म्हणून कुणी बाहेर आंदोलन करतो, मी मात्र असते सतत तुझ्या संपर्कात, माझा विचार कोण करतो ? पण मी जाणते सृष्टीसाठी निर्माण अन मुक्ती दोन्ही आढळ नियम आहेत आणि म्हणूनच तुला मुक्ती देण्यासाठी हात माझे सज्ज आहेत...

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

 

दरम्यान, यापूर्वी तेजस्विनीने देवीच्या रुपातील . डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, शेतकरी आणि प्राणीमित्र रुग्णवाहिका चालक आणि सिमेवर लढणारे जवान यांना आपल्या इल्यूस्ट्रेशनमधून वंदन केले आहे. 

दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. 2017 पासून तेजस्विनी पंडितने सिनेसृष्टीत एक पायंडाच पाडला आहे. तेजस्विनी पंडितच्या ह्या फोटोशूट मागे ईलसट्रेटर (चित्रकार) उदय मोहिते, फोटोग्राफर विवियन पुलन, लेखक आरजे आदिश आणि दिग्दर्शक धैर्यशील ह्यांचीही मेहनत आहे.

Recommended

Loading...
Share