By  
on  

स्वप्नील जोशीने सिंधूताई सपकाळ यांच्याविषयीची खास पोस्ट केली शेअर

गेले काही दिवस अभिनेता स्वप्नील जोशी त्याच्या आयुष्यातील त्याला भेटलेल्य दुर्गेविषयी लिहितो आहे. आताही त्याने एक खास पोस्ट केली आहे. यावेळी त्याने सिंधूताई सपकाळ यांच्याविषयीच्या भावना पोस्टमधून शेअर केल्या आहेत. स्वप्नील अपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘हे सत्र सुरु केल्यापासून गेले ७ दिवस मी वेगवेगळ्या स्त्रियांबद्दल लिहितोय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हे सत्र सुरु केल्यापासून गेले ७ दिवस मी वेगवेगळ्या स्त्रियांबद्दल लिहितोय. वेगवेगळ्या टप्प्यांवर मी यांचा सहवास अनुभवलाय आणि माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा आहे. पण आज मी ज्यांच्याबद्दल लिहिणार आहे त्यांना मीच नाही तर आपण सगळे मराठी, अनेक अमराठी लोकं सुद्धा ओळखतात. सिंधुताई सपकाळ. सिंधुताईंशी माझी अत्यंत गमतीशीर भेट झाली. कामानिमित्त मी एका शहरात गेलो होतो आणि सिंधुताई सुद्धा त्याच शहरात त्याच हॉटेलमध्ये उतरल्या आहेत असं मला समजलं. मी त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली आणि मला ती संधी मिळाली. त्यांना भेटायला गेलो, पाया पडलो. अनेकदा आयुष्यात संकट येतात, त्याच्याशी आपण लढतो, झुंजतो... ते करता करता आपण थकून जातो आणि त्याचा राग पुढे अनेक महिने, वर्ष कधी कधी आयुष्यभर जगावर काढत बसतो. पण सिंधुताईंना बघून मी अवाक झालो. इतकं सगळं सोसलेल्या स्त्रीने इतकं हसतमुख असणं आणि आपल्याला जे भोगायला लागलंय ते इतर कोणाला लागू नये, हा दृष्टिकोन ठेऊन काम करणं, हेच इतकं ताकद देणारं आहे, खऱ्या अर्थानी ऊर्जा देणारं आहे. भेटलो त्या दिवशी बोलणं झालं, गप्पा झाल्या... पण त्या नंतर अनेक दिवस ती ऊर्जा माझ्या बरोबर होती. आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशात, जगात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या त्यांच्या परीनं वेगवेगळ्या पातळींवर इतरांचं आयुष्य सोपं करण्यासाठी झटत आहेत. सिंधुताईंना, त्यांच्या प्रेरणेला, उर्जेला आणि तशाच ऊर्जेने काम करणाऱ्या प्रत्येक दुर्गेला माझं नमन! #navratri2020 #durga #durgapuja

A post shared by

Recommended

PeepingMoon Exclusive